आम्मांच निधन एक दिवस आधीच झाल होतं ?

टीम महाराष्ट्र देशा: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन एकदिवस आधीच झालं होतं अशी माहिती एआयडीएएमकेच्या नेत्या शशिकला यांचे बंधू व्ही. दिनाकरन यांनी दिली आहे. जयललिता यांचं निधन ५ डिसेंबर २०१६ ला झालेलं नसून ते ४ डिसेंबरलाच झालं असल्याचं ते म्हणाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने ही माहिती लपवली होती असं व्ही दावाकरन यांनी गुरुवारी तिरुवरूर जिल्ह्यातील मन्नारगुडीमधील एका कार्यक्रमात दिवाकरन यांनी ही माहित दिली आहे.

अम्मांचं निधन ४ डिसेंबरला संध्याकाळी ५.१५ वाजता झालं होतं. याबाबतची माहिती मिळताच मी चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलला पोहोचलो होतो. परंतु त्यावेळीही अम्मांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. याबाबत मी अपोलो हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रताप सी. रेड्डी यांना विचारले असता हॉस्पिटलच्या सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आम्ही जयललितांचं निधन झालं असल्याचं घोषित करू असं म्हटलं असल्याचंही दिनाकरन यांनी म्हटलं आहे.