fbpx

34 वर्षानंतर सर्वसामान्यांना द्यावा लागणार हा टॅक्स

टीम महाराष्ट्र देशा- मोदी २.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत असून टॅक्समध्ये सुट मिळणार का?याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, लाईव्ह मिंटनं दिलेल्या माहितीनुसार वडिलोपार्जित संपत्तीवर पुन्हा एकदा कर भरावा लागू शकतो. कारण, १९८५ पासून हा कर बंद आहे. पण. २०१९च्या अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या कराचा मसुदा देखील सरकारनं तयार केला आहे. तर, ज्या लोकांनी शाळा, कॉलेज, विद्यापीठ यासाठी दान केलं आहे त्यांना या करातून काही सुट मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. या अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, उर्जा या क्षेत्रांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.