इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?

पुणे : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून केलेल्या गर्भलिंग निदानाची जाहिरात आणि महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तत्काळ माफी मागण्याची मागणी केली होती.

त्यानंतरही राज्यभरातून इंदुरीकर महाराजांविरोधात महिला नेत्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदुरीकर महाराजांविरोधात बोलणाऱ्या तृप्ती देसाई यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. ”इंदुरीकर महाराज प्रकरणात माझ्यावर जो अश्लील शिवीगाळ होत आहे, धमक्या येत आहेत. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मला भोंगळे करून मारण्याची भाषा केली जात आहे तसेच इंदुरीकर महाराजांचे समर्थक मला कुत्री, रांड, साली ही भाषा वापरत आहेत.” असे देसाई यांनी महाराष्ट्र देशा’शी बोलताना हे सांगितले आहे.

Loading...

तसेच, याबाबतीत सुप्रियाताई सुळे, नीलमताई गोरे, यशोमतीताई ठाकूर, चित्राताई वाघ काही जाहीररीत्या बोलणार आहेत का नाही?.. का त्यांना मान्य आहे हे सगळे?, असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारला आहे. बबनराव लोणीकर काही म्हंटले लगेच या महिला नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात परंतु राज्यातील महिला सबलीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करणाऱ्या तृप्ती देसाई यांना मिळणाऱ्या धमक्या अश्लील शिवीगाळ त्यांचे होणारे चारित्र्यहनन हे या महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?

सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना गर्दी जमवण्यासाठी इंदुरीकर महाराज लागतात परंतु ते जेव्हा महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोलतात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा मात्र कोणत्याही पक्षाच्या महिला नेत्या याबाबतीत हे प्रकरण लावून धरत नाहीत याला आम्ही काय समजायचे.

मी सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटका तेलंगणा केरळ आणि दिल्ली राज्यात काम करते परंतु महाराष्ट्रात काम करीत असताना अशी होणारी अश्लील टीका मुख्यमंत्री गृहमंत्री आणि महिला नेत्या फक्त ऐकण्याचे काम करत आहेत या बाबतीत त्या बोलणार आहेत की नाही की त्यांची या सर्व विधानांना मूकसंमती आहे हे त्यांनी जाहीररित्या सांगावे, असेही त्यांनी यावेळी विचारले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
१५ एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने कोरोनाशी लढा सुरु होणार आहे : नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश