मार्केटमध्ये चर्चा गुगल असिस्टंटयुक्त वायरलेस इयरफोन्सची

मुंबई – वनप्लस कंपनीने बुलेट या नावाने नवीन वायरलेस इयरफोन्स भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्याची घोषणा केली असून यात गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. वनप्लस कंपनीने नुकत्याच आयोजीत केलेल्या कार्यक्रमात वनप्लस ६ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण केले. याच कार्यक्रमात बुलेट वायरलेस इयरफोन्सही सादर करण्यात आले. हे मॉडेल लागलीच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे.

Loading...

वायरलेस इयरफोन्सची वैशिष्ठ्ये

  • मूल्य ३,९९९ रूपये आहे.
  • यामध्ये गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. अर्थात कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा वापर करून म्युझिकचा ट्रॅक पुढे-मागे करणे अथवा आवाज कमी-जास्त करणे आदी फंक्शन्स पार पाडू शकतो.
  • याच्याशी संलग्न असणाऱ्या स्मार्टफोनवर कॉल करण्याची सुविधादेखील यात आहे.
  • अतिशय दर्जेदार मायक्रोफोन इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे.
  • वनप्लस बुलेट या वायरलेस इयरफोन्समध्ये दिलेली बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
  • रेंज १० मीटर इतकी आहे.
  • यामधील बॅटरीत वनप्लस कंपनीची डॅश चार्ज ही चलद चार्जींग प्रणालीदेखील देण्यात आली आहे. यामुळे फक्त १० मिनिटे चार्ज केल्यावर हा इयरफोन पाच तासांपर्यंत चालू शकत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
  • युएसबी टाईप-सी या प्रकारातील अ‍ॅडाप्टर देण्यात आले आहे.
  • इयरफोन्स ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोन वा अन्य उपकरणाशी कनेक्ट करता येतात.

 Loading…


Loading…

Loading...