पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली

पुणे : गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सामजिक बांधिलकी म्हणून अनेक मंडळांनी यंदा अवांतर खर्चाला कात्री लावत कोल्हापूर सांगलीतल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला आहे.

दरम्यान, पुणे शहरात गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन न करता मूर्तीदान करणार्या नागरिकांना महापालिकेतर्फे दोन किलो कंपोस्ट खत मोफत देण्यात येणार आहे. महापालिकेचे सर्व विसर्जन घाट, हौद, टाक्या या ठिकाणी मूर्तीदान करणाऱ्यांना खत वाटपाची सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १३ तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमधील फळं, फुलं आणि भाजी बाजार तसंच खडकी, मोशी आणि मांजरी उपबाजार बंद राहणार आहेत. असं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.

महत्वाच्या बातम्या