मालवणी महोत्सवसारख्या उपक्रमांमुळे कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही – सुभाष देशमुख

Min-Subhash-Deshmukh

ठाणे : ठाणेसह इतर शहरांमधे होत असलेल्या मालवणी महोत्सवांमुळे तेथील शेतकऱ्याच्या उत्पादनाला थेट विक्री करता येते. परिणामी त्यांच्या शेत मालाला चांगला भाव मिळतो. यामुळे कोकणातील शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत नाही, असे वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ते शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवाला भेट देत असतांना म्हणाले.

शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करतो. त्याची उत्पादन वाढविण्याची क्षमता मोठी असते. परंतु त्याचे निसर्गापुढे काहीही चालत नाही. अनेकदा त्याच्या मालाला चांगला भाव मिळाला नाही, त्यामुळे त्याला नैराश्य येते आणि त्या नैराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करतो. परंतु कोकणातील शेतकऱ्याला मालवणी महोत्सव सारख्या उपक्रमातून त्याचा माल थेट ग्राहकाला विकता येतो. सरकारने राज्यामध्ये आठवडा बाजार पद्धत सुरु केली असून याचा फायदा शेतकरी तसेच ग्राहकांना मिळणार आहे. तसेच शहरामध्ये नव्याने निर्माण होऊ घातलेल्या व्यापारी संकुल मध्ये शेतकऱ्यांसाठी काही गाळे आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्राम विकास मंडळ तर्फे मालवणी महोत्सव आयोजित केले आहे. याप्रसंगी आमदार संजय केळकर यांनी आयोजक सीताराम राणे यांचे कौतुक केले. अशा प्रकारचा महोत्सव गेली २० वर्षे सातत्याने करणे हे फार जिकीरीचे काम असून ते दरवर्षी यशस्वीपणे पार पाडत असतात. आयोजक सीताराम राणे यांनीही हा महोत्सव करत असताना शेतकऱ्याचा फायदा करणे हाच उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्याला कोणा दलालामार्फत त्याचा माल विकावा लागत नाही . शेतकरी ते ग्राहक हा संबंध प्रस्थपित करणे हाच आपला मालवणी महोत्सव आयोजित करण्याचा हेतू असल्याचे सांगितले.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...