मतदानाच्या एक दिवस अगोदरचा रात्रीस खेळ चाले बंद

टीम महाराष्ट्र देशा : मतदानाच्या एक दिवसआधी सार्वजनिक प्रचारावर बंदी असते, मात्र बहुतांश उमेदवारांकडून सर्रास एसएमएस तसेच सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी केला जातो. पण आता निवडणूक आयोगाकडून आशा प्रचारावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस अगोदरचा रात्रीस खेळ चाले बंद होणार आहे.

निवडणूक कोणतीही असो मतदानाच्या आदल्या दिवशी ‘लक्ष्मीदर्शना’ सोबतच सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडवला जातो. त्यामुळे जाहीर प्रचार संपल्यावरही मतदारांना झोप देखील घेता येत नाही. दरम्यान, या सर्व प्रकारबाबत अनेकवेळा तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे याला चाप बसवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पाऊले उचलण्यात आली आहेत.

फेक न्यूज थांबवा, अन्यथा….. सरकार कारवाईला सामोरे जा