आठवलेंच्या सभेत गोंधळ करणाऱ्या 150 कार्यकर्त्यांना अटक

रामदास आठवले

औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एक विचार एक मंच ने उभारलेल्या स्टेज वर न जाता आठवले यांनी आपल्या पक्षाने उभारलेल्या स्टेज वर जाणेच पसंद केले होते, यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष दिसून आला होता त्यामुळे सभेच्या ठिकाणी काही तरुण कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खुर्च्यांची फेकझोक करून सभेत व्यत्यय आणले होते.

कॅमेऱ्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी अटक केली सुमारे 150 तरुण अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोंबिग ऑपरेशन मध्ये आतापर्यंत 125 हुन अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली असून अटक होण्याच्या भीतीने काही जण भूमीगत झाले आहेत त्यांचाही शोध पोलीस घेत आहे.