JNU प्रकरण पडलं चांगलंच महागात,दीपिका असलेल्या जाहिराती दाखवण्याचे प्रमाण केलं कमी

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणे अभिनेत्री दीपिका पदूकोण चांगलेच महागात पडत आहे.दीपिकाने या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक चित्रपटाला फटका बसला आहे.

हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा लिक झाल्याचं देखील बोलले जात आहे.यामुळे या सिनेमाच्या कमाईवर आता आणखी परिणाम होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना आता दीपिकाने ज्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे अशा जाहिराती दाखवण्याचे प्रमाणही कमी करण्यात आलं आहे.

दीपिका ब्रिटानियाच्या गुडडे, लॉरिलयल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स आणि अॅक्सिस बँकेसह इतर काही ब्रँडसाठी जाहीराती करते. तिची नेटवर्थ 103 कोटी इतकी आहे. एका चित्रपटासाठी दीपिका 10 कोटी तर जाहीरातीसाठी 8 कोटी रुपये मानधन घेते असं म्हटलं जातं.

एका वृत्तवाहिनीला माहिती देताना एका कंपनीच्या एक्झिक्युटीवने सांगितलं की, एका ब्रँडने आम्हाला सांगितलं आहे की दीपिका असलेल्या जाहीरातीला दोन आठवड्यासाठी थांबवण्यात आल्या आहेत. तोपर्यंत वाद निवळेल अशी आशा आहे. दरम्यान, दीपिकाच्या जाहीरातींचे प्रक्षेपण कमी केलं असलं तरी ब्रँडने तिच्यासोबतचा जाहिरातींच्या कराराबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही.