दहीगाव उपसा सिंचनच्या पाण्यात विरोधक जाणार वाहून ?

करमाळा- सध्या पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजतोय तो मग कुठल्याही भागातील असो. भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील, असे नेहमीच म्हटले जाते. सध्या हेच पाणी राजकारणाचे देखील महत्त्वपूर्ण साधन बनत चालले आहे, हे सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी याआधीच सिद्ध केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याची धडपड आता करमाळा विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांनी चालविली असल्याचे, दिसून येत आहे.

राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीच्या राजकारणाचे नाटय़प्रयोग सुरू झाले. करमाळ्यात गेल्या काही दिवसांपासून जो गलबला झाला आहे. तोही खूप चर्चेत राहिला आहे. तो म्हणजे दहिगावं उपसा सिंचनाचे पाणी.

Loading...

करमाळा तालुक्यातील २९ गावे दुष्काळग्रस्त आहेत. ही गावे दुष्काळ मुक्त होण्यासाठी तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारने १९९५ मध्ये दहिगावं उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. या योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील कामाची चाचणी काल रविवार दि. १३ मे रोजी कुंभेज येथे झाली. सतत च्या पाठपुरवठ्यामुळे ही दहिगावं उपसा सिंचन योजना सुरू झाल्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

सन १९९५ पासून दहिगावं सिंचनाचे काम रखडलेले होते. जो आमदार ही योजना पूर्ण करेल तोच पुढचा २०१९ चा आमदार होईल अशी तालुकाभर चर्चा गेल्या २०१४ विधानसभा निवडणूकीनंतर सुरू आहे. आमदार पाटील यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या पाठपुरवठ्यामुळे ही योजना पुर्णात्वकडे गेलेली असून २०१९ विधानसभा आणखी सोप्पी करण्याचा प्रयत्न आमदार पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचनाचे पाणी आले परंतु या पाण्यात विरोधक वाहून जाणार का?? अशी तालुकाभर चर्चा सुरू आहे.

दहिगावं उपसा सिंचन यशस्वी करण्यासाठी आमदार पाटील यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे राष्ट्रवादीच्या रश्मी बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि जि प अध्यक्ष संजय शिंदे यांना आगामी विधानसभा जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेना-भाजप युती सरकारने १९९५ साली दहिगावं उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली मात्र द्वेषाच्या राजकारणामुळे हि योजना रखडली होती . विकासाची गंगा अंगणी येताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले