दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणार श्री गणेश परिवाराची कायमस्वरुपी स्थापना

dagadushet

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरामध्ये भगवान गणेशांच्या परिवाराची कायमस्वरुपी स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये देवता रुपात भगवती देवी सिध्दी, भगवती देवी बुध्दी, गणेशपुत्र लक्ष आणि लाभ आणि भगवान श्री नग्नभैरव यांच्या चांदीच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. ही स्थापना शनिवार, दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ ते सायंकाळी ५.१५ यावेळेतील शुभमुहुर्तावर होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सुनील रासने, महेश सुर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, राजाभाऊ घोडके, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, ज्ञानेश्वर रासने उपस्थित होते.भगवान श्रीगणेशाच्या विश्वनिर्मिती तसेच संचालन कायार्साठी त्यांच्या दोन शक्ती ते प्रकट करीत असतात. यापैकी ज्ञानशक्ती असणा-या देवीला श्री बुद्धी तर क्रियाशक्ती असणा-या शक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात. गणेशाच्या उजव्या हाताला देवी बुद्धी विराजमान असते तिच्या एका हातात दीप तर दुस-या हातात कमळ असे पूजा साहित्य असते. श्रीगणेशाच्या डाव्या बाजूला देवी सिद्धी विराजमान असते. एका हातात मोरयाची सेवा करण्यासाठी चवरी तर दुस-या हातात कमळ असे तिचे स्वरुप असते. या दोघींच्यासमोर भगवान श्री गणेशांचे पुत्र रुपात श्री लक्ष आणि श्री लाभ विराजमान असतात.

Loading...

अशोक गोडसे म्हणाले, या चार देवतांच्या सोबत भगवान श्री नग्नभैरव स्थापित होत असलेला पाचवा विग्रह आहे. ही भगवान गणेशांची कार्यकारी शक्ती आहे. त्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले असल्याने त्यांना नग्न असे म्हणतात. तर भैरव शब्दात भय आणि रव असे दोन शब्द आहेत. पायाच्या आवाजाला रव असे म्हणतात. ज्यांच्या पायाच्या आवाजाने अर्थात आगमनाची चाहूल लागल्याबरोबर ईश्वर,महेश्वर देखील आदरयुक्त भितीने आपापली कामे निमूटपणे करतात ज्यांना श्रीनग्नभैरव असे म्हणतात. भगवान श्री गणेश यांच्या दर्शनापूर्वी मंदिरात प्रवेश करण्यासाठी भगवान श्री नग्नभैरवांची अनुमती घ्यावी असे शास्त्र सांगते. श्री मुद््गल पुराणामध्ये याविषयी सविस्तर उल्लेख आहे.

श्री गणेश परिवारातील या पाच मूर्तींच्या स्थापनेच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भगवान श्रीगणेशांचा परिवार साकार होत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते व विश्वतांच्या उपस्थितीत विधीवत या मूर्तींची स्थापना होणार आहे. यावेळी मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी या सोहळ्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळ्यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
गणेशजन्म सोहळ्यानिमित्त अथर्वशीर्षावर निरुपण व गणेश गीते हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. मुक्ता गरसोळे -कुलकर्णी कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. तसेच मंगळवार, दिनांक २८ जानेवारी म्हणजेच गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ४ वाजता आर्या आंबेकर यांचा स्वराभिषेक कार्यक्रम, सकाळी ८ वाजता गणेशयाग, दुपारी १२ वाजता गणेशजन्म सोहळा, संध्याकाळी ६ वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा मिरवणूक, रात्री ८.३० वाजता श्रींची महामंगल आरती, रात्री १० ते पहाटे ३ पर्यंत गणेश जागर असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

बुधवार, दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता गणेशजन्मावर कीर्तन व निरुपण होणार आहे. अरण्येश्वर येथील कीर्तनप्रेमी मंडळ सादरीकरण करणार आहे. पहाटे ३ वाजेपासून मंदिर भक्तांसाठी खुले असणार आहे. तसेच मंदिराला आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'