कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं ! विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित

टीम महाराष्ट्र देशा : जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर काँग्रेसने आता निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी, काल (मंगळवारी) रात्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, संजय निरुपम, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. 2019 च्या निवडणुकीच्या निमित्ताने जागा वाटपावरुन दोन्ही पक्षात चर्चा झाली.

समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडी बनवण्याचं निश्चित झालं. या बैठकीत सत्ताधारी भाजप-शिवसेनेविरोधात आघाडी करण्याचा निर्णय झाला. जागा वाटपाबाबत पहिल्यांदाच बैठक घेऊन चर्चा झाली.