एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे विधान

eknath khadse

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता न येऊ शकल्याबद्दल त्यांनी फडणवीसांना दोष दिला होता. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेमुळं राज्यात भाजपचं सरकार आलं नाही की काय, याचा शोध घेत असल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. खडसे यांनी थेट फडणवीसांवर आरोप केल्यानं त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चेला ऊत आला आहे.

अशातच नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची एक महत्वाची बैठक शरद पवार यांनी घेतली होती या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची खात्रीलायक बातमी आहे. आता खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध नसल्याचे समोर येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही. उलट ते पक्षात आल्यास पक्षाला राज्यात फायदा होईल, असे मत आपण पक्ष नेत्यांकडे व्यक्त केले असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले आहे.

देवकर म्हणाले की खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर जिल्ह्यात कोठे कोठे व राज्यात कसा फायदा होईल हे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले. त्यावेळीं आपणही त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघासह राज्यात फायदा होईल, असे सांगितले. त्यांच्या प्रवेशाला माजी मंत्री यांनी विरोध केला असे सांगितले जात आहे ते चुकीचे आहे. आपण त्यांच्या पक्ष प्रवेशाला कोठेही विरोध केला नाही. अस देखील देवकर यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या