भेंडवळची भविष्यवाणी जाहीर : पाऊस,शेती, कोरोनाचे संकट, राजकारणासह अनेक गोष्टींवर भाकितं

bhendwal

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असताना आज अखेर भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज (शनिवार) पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराजांनी जाहिर केली. भविष्यवाणीनुसार यावर्षी पाऊस कमी राहणार असून पिक परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं सर्वसाधारण येतील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे.

पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल. पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल असे भाकीत देखील वर्तविण्यात आले आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रोगराईचा सामना करावा लागणार असल्याने कोरोनाचे संकट कायम राहणार आहे. राजकीय परिस्थितीवर केलेल्या भाकितानुसार राजा कायम राहणार असून संकटांचा सामना मात्र करावा लागणार आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. तर नैसर्गिक संकटांमध्ये जीवित हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सांगितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP