कुठे आहेत मराठीचे कैवारी ? मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून परप्रांतीयाचा महिलेवर हल्ला

टीम महाराष्ट्र देशा : मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून प.बंगालच्या तरुणाने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात हा प्रकार समोर आला आहे. महिलेने पश्चिम बंगालच्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितले पण रागाच्या भरात या तरुणाने महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा लगावला. पश्चिम बंगालचा हा तरुण कुरियर बॉय आहे. आधी त्याने त्या महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा मारला.

एवढ्यावरच तो तरुणा थांबला नाही तर त्यानंतर त्याने पेनाने महिलेवर वार केले. इब्राहीम शेख असे या तरूणाचे नाव असून तो दादरच्या पालांडे कुरीयर मध्ये काम करतो. त्याच्याकडे किंग सर्कलच आधाक कार्ड सापडलं आहे. गेल्या २० वर्षापासून मुंबईत राहत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं आहे. पुस्तकांची डिलीव्हरी द्यायला घरी गेला असता महिलेने मराठी बोलण्यास सांगितले. आणि त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली.

दरम्यान , मुंबईमध्ये मराठीचे कैवारी भाषेचा अभिमान बाळगून गेले अनेक वर्ष आपली राजकीय पोळी भाजत आहेत. आपले राजकारण मराठीच्या मुद्द्यावर रेटून नेत आहेत मात्र अशा वेळेस हे पक्ष नक्की काय करत आहेत असा सवाल राज्यातील प्रत्येक मराठी माणूस विचारत आहे. आता मराठीसाठी लढणारे राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.