महानगरपालिका कारभाऱ्यांच्या ‘भ्रष्ट’ कारभाराला लागणार चाप; आले ‘एएससीडीसीएल’

aurangabad manapa and correpted officer 2

औरंगाबाद/अभय निकाळजे : गेल्या 30 वर्षात शहराचा विकास करण्याच्या ऐवजी स्वविकासावर केंद्रित झालेल्या औरंगाबाद महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्ट्र कारभाराला चाप लावला आहे. शहराच्या विकासासाठी शासनाने ‘औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ (एएससीडीसीएल) स्थापन केली.

या कंपनीने शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठीची निविदा काढली आहे. ज्यामध्ये वाहतुकीचा अनुभव असणाऱ्या इच्छूकांना आमंत्रित केले आहे. त्यामध्ये ज्या संस्था शहर बस सेवा चालवू शकतात आणि त्या बसची देखभाल आणि दूरूस्तीही करू शकतात. अशांना त्यामध्ये प्राधान्य असणार आहे. या संस्थांनी आपली माहिती आणि कागद पत्रे 10 एप्रिल 2018 च्या दुपारी चार वाजेपर्यंत एएससीडीसीएल च्या कार्यालयात सादर करायची आहेत.

Loading...

महापालिकेची सेवा फ्लाॅप का?
सध्याचे भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी हे जेव्हा महापौर होते. तेव्हा अकोला प्रवासी वाहतूक संस्थेला सिटी बस सेवा चालविण्याचे कंत्राट दिले होते. त्यामध्येही महापालिकेची ‘परसेंटेज’ची प्रथा जोपासली गेली होती. त्यामध्ये चर्चा अशीही होती, की त्या प्रवासी संस्थेत औरंगाबादच्या प्रकल्पापुरती महापालिकेच्या काही बड्या पदाधिकाऱ्यांची ‘पार्टनरशिप’ ही होती. ही वाहतुक काही म्हणजे दोन ते तीन वर्ष बऱ्यापैकी चालली. नंतर त्या बसची ना योग्यप्रकारे देखभाल केली गेली ना दूरूस्ती. त्या जे कर्मचारी काम करीत होते. त्यांचे पगार कमी मग तिकिट विक्रीतही मोठा भ्रष्टाचार झाला. ती सेवा बंद झाली.

काय आहे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेची परिस्थिती?

एसटी महामंडळाने खरी या शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेची वाट लावली. मीटरचा रिक्षा आणि सिटी बस ही औरंगाबादची ओळख होती. एसटीच्या 110 सिटी बस कधी काळी या शहरातील संपूर्ण वाहतूक हाताळत होत्या. तेव्हा अती महत्वाच्या कामासाठीच रिक्षाचा आणि हो तोही मिटरच्या रिक्षाचा वापर व्हायचा. एसटीतील यूनियनच्या पदाधिकाऱ्यांना गावोगाव फिरण्याच्या ड्युट्या नको होत्या म्हणून त्यांनी युनियनच्या जोरावर सिटी बसच्या ड्युट्या घेतल्या. मग सिटी बसच्या टाईम टेबलची वाट लागली. बसची वाट पहात स्टाॅपवर थांबलेल्या प्रवाशांनी ‘शेअरिंग रिक्षा’ चा ऑप्शन स्विकारला. हा प्रवाशांनी स्विकारलेला पर्याय रिक्षावाल्यांनी सुरू केला. कारण मीटरपेक्षा या शेअरिंगमध्ये कमाई जास्त असल्याने त्यांनी मीटरऐवजी शेअरिंग रिक्षाच सुरू केली. आता तिच शहराची सार्वजनिक वाहतूक आहे.

आता भिस्त आहे ती एएससीडीसीएल वर

त्यामुळे आता एएससीडीसीएल काय विचार करून सिटी बस चालवायला देणार आहे. हा मुदा महत्वाचा आहे. त्यामध्ये जर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप झाला तर ही सेवाही औरंगाबादकरांसाठी ‘दिवा स्वप्न’ ठरेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'