पुरोगामी महाराष्ट्रात यांना खरचं प्रबोधनकार म्हणावं का?

पुणे : स्त्री संग सम तिथीला झाला की मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला की मुलगी होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कीर्तनकार इंदुरीकर यांनी माफीनामा दिला. त्यानंतर आता सोलापुरातील अपर्णा रामतीर्थकर यादेखील आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत. मुख्य म्हणजे त्या इंदुरीकरांपेक्षाही स्पष्टपणे स्त्रीपुरुष समानतेच्या विरोधात बोलताना दिसतात.

बीबीसी मराठीने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार, स्त्रियांनी कसे वागावे, उठावे, कसे कपडे घालावे, स्त्रीच्या मर्यादा याविषयी त्यांनी काही वादग्रस्त विधान केली आहेत. त्यांच्या प्रसिध्द झालेल्या काही व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसते. ”उंबऱ्याची मर्यादा असते मुलगी. बाईनं उंबरा ओलंडायचा नसतो. उंबरा म्हणजे मर्यादा. उंबऱ्याची मर्यादा असते’. तर ‘498 आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा इतका गैरवापर बायका करतात, की या कायद्यामुळे 10 लाख पुरुषांनी आत्महत्या केल्यात.’ अशी काही स्त्रीपुरुष समानतेच्या विरोधात जाणारी विधानं त्यांनी केली आहेत.

Loading...

कीर्तनकार इंदुरीकर यांच्याप्रमाणेच रामतीर्थकर बाईदेखील शास्त्रांचा आधारावर हिंदू धर्म, संस्कृती आणि भारतीय परंपरेबद्दल बोलतात. त्यांचा श्रोताही मुख्यतः ग्रामीण भागातील आहे. त्यांच्या या वक्तव्यांना अनेक स्त्रियांनीदेखील आक्षेप नोंदविला आहे. मात्र तरीही त्या आपल्या बेताल वक्तव्यांवर ठाम असतात. तर दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी देखील त्यांना खुले पत्र पाठवले होते. यात बाळ यांनी सावित्रीबाई फुले, फातिमा बी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतानी स्त्री शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी जे विचार मांडले. त्यावर रामतीर्थकर बाईंनी मांडलेले हे विचार बोळा फिरविणारे असल्याचे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.

महाराष्ट्राला संतांची सर्वात मोठी परंपरा आहे. पण पुरोगामी महाराष्ट्रात स्वतःला प्रबोधनकार म्हणवणारे प्रबोधनकार उघड उघड स्त्री-विषमतेवर बोलत असतात. मग यांना खरेच प्रबोधनकार म्हणणे योग्य आहे का, आता हे महाराष्ट्रानेच ठरवायचं आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती