fbpx

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात अनोख्या पद्धतीने स्वागत

10 nmv

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात आज पासून राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परिक्षेनिमित्ताने विद्यार्थ्यामध्ये या परीक्षेचा एक प्रकारे तणाव असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या वातावरणात परीक्षेला सामोर जावं या दृष्टीने पुण्यातील काही शाळांमध्ये परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं गेलं.  पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयात दहावी च्या परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्यांच औक्षण करून टिळा लावून स्वागत केलं गेलं आणि परीक्षेसाठी यशस्वी होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

10th

यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये :

  • दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी
  • 9 लाख 73 हजार 134 विद्यार्थी, तर 7 लाख 78 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश
  • 16 लाख 37 हजार 783 नियमित विद्यार्थी, 67 हजार 563 पुनर्परीक्षार्थी आणि 46 हजार 7 इतर (खाजगी श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषयासह प्रविष्ठ)
  • बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठीही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावरह पोहोचणं अनिवार्य
  • गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी, मागच्या वर्षी 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी होते
  • संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 657 परीक्षा केंद्र
  • दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 252 भरारी पथकांची नियुक्ती

‘महाराष्ट्र देशा’कडूनही दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा!