मराठा क्रांती मोर्चा: मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले

maratha kranti morcha

औरंगाबाद- राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तेथे आलेल्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या.एम.जी.गायकवाड हे सुभेदारी विश्रामगृह येथे समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांना  भेटून त्यांचे म्हणने एकूण घेत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आयोगाला निवेदन देण्यासाठी जमले होते.

सराटे हे मराठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त एजन्सीचे ते काम करीत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सुभेदारीवर गाठले आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी सराटेविरोधात घोषणा दिल्या. यावेळी रविंद्र काळे, आप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे पाटील, रमेश गायकवाड, अभिजीत देशमुख, विनोद पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती.

2 Comments

Click here to post a comment