माजी न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन

टीम महाराष्ट्र देशा– ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेख, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे बुधवारी रात्री १ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

गेल्या दोन दिवसांपासून चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

मध्य प्रदेश मधील रायपूर येथे चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ मध्ये झाला होता. न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत म्हणून २० नोव्हेंबर १९८९ पर्यंत तब्बल १७ वर्षे न्यायदानाचे कार्य केले.

दरम्यान, ते काही दिवस प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी महिला, आदिवासी, लहान मुले, मनोरुग्ण, बंदिवान आदींच्या मूलभूत अधिकारांवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले.
स्वातंत्र्य लढ्यामध्येही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत २००३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.