इंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.

आज २ ऑक्टोबर जगभरात इंटरनॅशनल कॉफी डे साजरा केला जातो. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. एका कॉफीमुळे अनेक नवीन नाती निर्माण होतात.कॉफीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असून कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात. यामुळे कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु ती प्रमाणात पिणे आवश्यक आहे. जाणून घ्या, याचे फायदे… कमी साखरेची कॉफी पिणे हृदयाला फायदेशीर असते. कॉफी प्यायल्याने शरीरातील सुजचे प्रमाण कमी होतो ज्यामुळे कार्डीओवैस्क्यलर डिजीज म्हणजेच हृदय रोग कमी होतो. कॉफीमध्ये अँटीकँसर गुण असतात. ज्यामुळे कँसर होण्याची भीती कमी होते. यासोबतच हे लिव्हर कँसरपासून ४० टक्के वाचवते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कॉफी तुमच्या स्नायूतंत्राला दुरुस्त ठेवते. यासोबतच तुम्हाला यशस्वी एथलीट बनवण्यात मदत करते. तसेच यामुळे चयापयक्षमताही वाढते.

Loading...

कॉफी चरबी कमी करण्यास खूपच उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तुम्ही वर्कआउट करण्यापूर्वी कॉफी पिल्यास तुम्हाला ऊर्जा मिळते. यामुळे तुम्ही जिममध्ये सहज वर्कआउट करू शकाला. परिणामी तुमचे वजन लवकर कमी होईल.

कॉफी प्यायल्याने मूड चांगला राहतो. एक कप कॉफी तुमच्या मूडला लवकरच चांगले करते. यामुळे तुमचा ताण-तणाव नाहीसा होण्यास मदत होते.Loading…


Loading…

Loading...