कर्जमाफीनंतर आता शेतजमीन परत मिळण्यासाठी आंदोलन

मुंबई – कल्याण जवळील नेवाली विमानतळासाठी दिलेली जमीन परत मिळावी यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना पेटवून दिले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्तांवरही हल्ला केला. घटनास्थळी अजूनही तणावाची स्थिती आहे.
पोलिसांची गाडी पेटवून दिली

नेवाळी विमानतळासाठी बळजबरीने जमीन संपादित केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी अनेक वाहनांना आगीच्या भक्षस्थानी दिल्यामुळे ठाणे-बदलापूर मार्ग ठप्प झाला आहे. डोंबिवली – बदलापूर पाइपलाइन रोडवर डावलपाडा येथे पोलिसांच्या गाडीलाही आंदोलकांनी पेटवून दिले.