राष्ट्रवादीत महिलांचा आदर-सुरेखाताई; ‘मुंडे आणि मेहबूब शेख यांच्या राष्ट्रवादीबद्दल तुम्ही बोलत आहात का?’

punekar

मुंबई : सुप्रसिद्ध लोक कलावंत सुरेखा पुणेकर ह्या उद्या(१६ सप्टें.)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुरेखा यांनी देखील दरेकरांना आक्रमक होत उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की,’राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे’. तसेच या कारणामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

सुरेखा पुणेकरांच्या याच वक्तव्यावर आता भाजपने सुरेखा पुणेकरांना जशाच तसे खडे बोल सुनावले आहेत. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत सुरेखा पुणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे आणि मेहबूब शेखला पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस विषयी तुम्ही बोलत आहात का सुरेखाताई?’ असे ट्वीट करत भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, काल प्रविण दरेकर शिरुर दौऱ्यावर एका कार्यक्रमात बोलत असतांना दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की,’राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे’. दरेकरांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या