भूलथापांना बळी न पडता वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहा : उद्धव ठाकरे

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : थापाडे भाजप सरकार व चोर काँग्रेस यांच्या भूलथापांना बळी न पडता वनगा कुटुंबियांच्या पाठीमागे उभे रहा असे भावनिक आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यासाठी केले. उद्धव ठाकरे यांनी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, डहाणू आदी ठिकाणी मतदारांशी भेट घेत रॅली काढली. याप्रसंगी ते बोलत होते. पालघरची जागा जाणार या भीतीने राज्यातील भाजपचे सर्व नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही प्रचारासाठी उतरले असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

पालघर पोटनिवडणूक शिवसेना, भाजपकडून प्रतिष्ठेची बनली असून या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेने दिवंगत खासदार वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन भावनिक मुद्द्याला उद्धव ठाकरे यांनी हात घातला आहे. वनगा कुटुंबीयांचे साधे सांत्वनही करायला भाजपला वेळ मिळाला नसल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

2 Comments

Click here to post a comment