जयंत पाटलांची उपयुक्तता किती आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे, गोरेंचा घणाघात

blank

टीम महाराष्ट्र देशा : कालवा समितीतून वागळल्याच्या कारणास्तव भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. आज पुण्यात कालवा समितीची बैठक पार पडली. कालवा समितीतून पाटील यांनी चार सदस्यांना वागळल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीत शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे.

‘जलसंपदामंत्री जयंत पाटील हे आमची उपयुक्तता नसल्याने आम्हाला कालवा समितीतून वगळल्याचे कारण देत आहेत. जयंत पाटील महान नेते आहेत. त्यांची उपयुक्तता किती आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे,’ असा खोचक टोला भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे. नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आम्हाला वगळण्यात आलंय. तसेच बारामतीशी इमान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप जयकुमार गोरे यांचा आरोप आहे.

दरम्यान, भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझ्या समर्थकांना कालवा समितीतून वागळल्याचा आरोप केला होता. या समितीतून आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख,विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी उत्तमराव जानकर यांना वगळण्यात आले आहे. तर यावर पाटील यांनी निंबाळकर यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले, ”त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्या सांगण्यावरून वगळले’. त्यात प्रॉब्लेम आहे? दरम्यान, निंबाळकर यांनी आग्रह केल्यामुळेच बारामती मतदारसंघात जाणारे नीरा देवघर प्रकल्पाचे चाळीस टक्के पाणी माढ्यात वळवण्यात आल्याचे मानले जाते.हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी वळविण्याच्या मुद्द्यावर निंबाळकर यांनी थेट बारामतीकरांवर निशाणा साधला असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.