कुटुंब नियोजनासाठी ‘योगी’ सरकारचा फंडा नवविवाहित जोडप्यांसाठी एक ‘खास’ आहेर

वेबटीम:  भारताची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच आहे. त्यातही उत्तर प्रदेश राज्याचा लोकसंख्येच्या बाबतीत देशात पहिला क्रमाक येतो. आता हि वाढती लोकसंख्या रोखण सरकार पुढील मोठ आव्हान आहे. मात्र आता उत्तर प्रदेश सरकारकडून नवीन नामी शक्कल लढवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात आता राज्य सरकारकडून नवविवाहित जोडप्यांसाठी एक ‘खास’ आहेर मिळणार आहे. जिथे लग्न असेल तिथल्या जवळच्या आशा सेविका नवविवाहित जोडप्यांना एक ‘शगुना’चं किट देणार आहेत. या किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या असतील. कुटुंब नियोजनासाठी ‘योगी’ सरकारने हा फंडा शोधून काढला आहे.

‘शगुन’ म्हणून दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये आरोग्य विभागाचं एक पत्रही असणार आहे. या पत्रात कुटुंब नियोजनाचे फायदे लिहिलेले असतील. ‘हम दो, हमारे दो’ चा संदेश देत कुटुंबाची संख्या २ मुलांपर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठी या योजनेमार्फत प्रोत्साहन देण्यात येणार आहे. येत्या ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ होईल.