अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी…संसार थाटण्यापूर्वीच वधूचं निधन

शिरूर/ स्वप्नील भालेराव : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याधील म्हसे येथे ऋदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे दुपारी लग्न झालेल्या वधु ला मंडपातच अचानक त्रास होऊन, उपचारापुर्वीच निधन झाल्यांने वधु वरांच्या कुंटुबासह नातेवाईकावर दुःखाचे संकट कोसळले आहे.

जयश्री मुसळे असे या नवविवाहितेचे नाव आहे. म्हसे येथील बबन मुसळे यांच्या हिरामण व दिंगबर या दोन मुलांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट  येथील सख्या मावसबहीणी असलेल्या जयश्री गोंडा व विजय धर्मन्ना भंगर्गी यांच्या बरोबर थाटामाटात म्हसे येथे दुपारी बारा वाजता उत्साहात झाला.

यापैकी जयश्री हिचा विवाह हिरामण यांच्या सोबत झाला, लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्न पाहात, या जोडप्यांने ऐकमेकांना मिठाईचे घास ही भरले. अक्कलकोट वरुन आलेल्या आई वडील व पाहुने आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले. त्यानंतर अचानक जयश्रीला ताप , चक्कर येऊन त्रास होऊ लागला, सासरे बबन मुसळे व ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरुर ला दवाखान्यांत उपचारासाठी आणले, मात्र जयश्रीची प्राणज्योत त्यापुर्वीच मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसारांची स्वप्न पाहणाऱ्या जयश्रीच्या अकाली  जाण्याने हिरामणचेही स्वप्न संपले. दरम्यान जयश्रीच्या मृत्यूची शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे.

You might also like
Comments
Loading...