अनुपम खेर यांची FTII च्या विद्यार्थ्यांबरोबर ‘खाने पे चर्चा’

पुणे: एफ. टी. आय. आय. च्या चेयरमन पदी नियुक्ती झाल्यानंतर अनुपम खेर यांनी प्रथमच पुण्यात येऊन संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या खेर यांनी थेट कॅन्टीन मध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत जेवण घेतलं.खेर यांच्या अनौपचारिक,खेळकर वावरण्याने विद्यार्थी सुखावले.

गजेंद्र चौहान यांच्या गच्छंती नंतर रिक्त झालेल्या FTII च्या चेअरमन पदी अनुपम खेर यांची नियुक्ती झाल्यावर खेर यांनी FTII मध्ये येऊन सूत्रे स्वीकारली. अनुपम खेर यांनी आज दुपारी कोणालाही कल्पना न देता १ वाजता संस्थेच्या प्रवेशद्वारावर चार चाकी वाहनातून आले. तेव्हा प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने गाडीतील चालकास नाव विचारले आणि ओळख पत्र मागितले. तेवढ्यात मागच्या बाजूला बसलेले अनुपम खेर हे लगेच खाली उतरून प्रवेशद्वारून संस्थेत प्रवेश केला. तेव्हा त्यांना पाहून सर्वजण आश्चर्य चकित झाले.त्यानंतर प्रमुख अनुपम खेर यांना भेटण्यास आल्यावर अर्धा तास विद्यार्थीशी त्यांनी संवाद साधला.

Loading...

त्यानंतर संस्थेतच्या आवारातील एका झाडा खाली लावण्यात आलेला आंदोलनाचा कापडी फलक त्यांनी स्वतः काढला. त्या नंतर अनुपम खेर यांनी त्यांचा मोर्चा कॅन्टीनकडे वळवला. तिथे गेल्यावर त्यांनी विद्यार्थ्या बरोबर रांगेत उभे राहून हातामध्ये ताट घेऊन जेवण घेतले आणि एका टेबलवर जाऊन 4 विद्यार्थी समावेत त्यांनी जेवण केले.आपल्या सोबत अनुपम खेर हे जेवण करीत आहेत आणि बोलत आहे.त्यामुळे ते विद्यार्थी गोधळून गेले होत. खेर यांनी आपण सकारात्मक वृत्तीने आलो आहोत आणि विद्यार्थी,FTII चे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्यावर भर राहील असं म्हटलंय.

मी ४० वर्षांपूर्वी पुण्यात विद्यार्थी म्हणून एफटीआयआय मध्ये आलो होतो.तेव्हाचे दिवस मी कधी ही विसरू शकत नसून आज एक विद्यार्थी या संस्थेवर अध्यक्ष म्हणून काम करण्यास आला आहे.आंनदीची बाब असून या संस्थेत विद्यार्थी म्हणूनच आल्याची भावना एफटीआयआय चे अध्यक्ष जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी भावना व्यक्त करीत जुन्या आठवणी उजाळा दिला. तसेच ते पुढे म्हणाले की, जे काही मागील घटना लक्षात घेता आणि सद्याची परिस्थिती पाहता.प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थीना सहभागी करून घेणार असून चांगले वातावरण कसे राहिले यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी देखील मला अधिक चांगल्या प्रकारे साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विद्यार्थ्यांनीही खेर यांच्या सकारात्मक पावित्र्याचं स्वागत केलं आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले