असा कनवाळू राज्यपाल राज्याला मिळाला तर राज्याच भलं नक्कीच होईल

udhhav thakarey

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अरविंद साळवे आदि नेतेही उपस्थित होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या घडामोडीवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला याची कबुली दिली.

ठाकरे म्हणाले, ”राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी ७२ तासांचा वेळ दिला होता. भाजपने सरकार स्थपन करण्यास नकार दिल्याने राज्यपालांनी आम्हला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. मात्र आम्ह्नाला बहुमत सिध्द करण्यासाठी फक्त २४ तासांचा वेळ दिला गेला. बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांकडे आम्ही ४८ तासांचा वेळ मागितला होता. मात्र त्यांनी आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

तसेच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला काल पहिल्यांदाच शिवप्रतव दिला. राज्यात सरकार स्थापन करणे आणि ते स्थिरपणे चालविणे म्हणजे पोरखेळ नाही. त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटून राज्यात सत्तास्थापनेसाठीदावा केला आणि राज्यपालांकडे आम्ही मुदत वाढ मागितली होती. मात्र आम्ही ४८ तासांचा वेळ मागूनही राज्यपालांनी आम्हाला ६ महिन्यांचा वेळ दिला. असा कनवाळू राज्यपाल देशाला आणि राज्याला मिळाला तर राज्याच भलं नक्कीच होईल, अशी मला खात्री आहे. असा टोमणाही ठाकरे यांनी राज्यपालांना यावेळी लगावला.

ते म्हणाले, ” हिंदुत्त्व आमची विचारधारा आहे. जर कोणत्याही भिन्न विचारधारेचे नेते एकत्र येऊन सरकार स्थापन करू इच्छित असतील तर काही मुद्य्यांवर चर्चा होणे गरजेचे असेते. हाच विचार आम्हीदेखील केला होता. देशात जर काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती भाजप, नितीश कुमार आणि चंद्राबाबू रामविलास पासवान आदि भिन्न विचाराच्या नेत्यांनी जर एकत्र येऊन सरकार स्थापन केले असेल तर आम्ही एकत्र आलो तर काय हरकत आहे. असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या :