इस्टर्न एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधानांची आवश्यकता नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – दिल्लीतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी बनवण्यात आलेला इस्टर्न एक्स्प्रेस वे सर्वसामान्यांसाठी सुरू न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारले आहे.

या एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधानांची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याकडे वेळ नसेल, ३१ मे पर्यंत उद्घाटनाची वाट पाहा, अन्यथा १ जूनला तो सर्वसामान्यांसाठी खुला करावा, असा आदेशच न्यायालयाने आज (गुरूवार) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिला आहे.

दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा मार्ग केवळ पंतप्रधान मोदींच्या व्यस्ततेमुळे खुला झालेला नाही. यावर भाष्य करत न्यायालयाने गाझियाबाद आणि हरयाणाच्या पलवलला जोडणाऱ्या या इस्टर्न एक्स्प्रेस वेचं लवकर उद्घाटन करण्याचे आदेश दिले आहेत.Loading…
Loading...