fbpx

२०१९ पर्यंत कर्नाटकात भाजप सत्तेवर येईल – अमित शहा

amit shaha

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हत. मात्र भाजप १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांना बहुमतासाठी आणखी ८ जागांची आवश्यकता होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत राज्यपालांकडे सत्ता स्थापण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी कॉंग्रेस एवजी भाजपला सत्ता स्थापण्यासाठी बोलावल्याने कॉंग्रेसने या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपने सत्ता गमावली.

दरम्यान २०१९ पर्यंत कर्नाटकात सत्तांतर होईल, असे अमित शहा यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले की, आम्हाला कर्नाटकात फार काही करायची गरज नाही. काँग्रेस व जनता दलाचे आमदारच आमचे काम करतील आणि तेथील सरकार कोसळेल. त्यावेळी जनता दलाच्या मदतीने तुम्ही सरकार बनवाल का, असे विचारता शहा म्हणाले की, राजकारणात कायमस्वरूपी असे काहीच नसते. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे आताच सांगता येत नाही. कदाचित काँग्रेस व जनता दल या दोन्ही पक्षांतील आमदार फुटून वेगळा गट तेव्हा स्थापन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2 Comments

Click here to post a comment