नेवासा तालुक्यात मुरकुटे गटाला चार तर गडाख गटाला तीन ग्रामपंचायती

newasa-taluka-map

भागवत दाभाडे/ नेवासा: तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सात पैकी चार ग्रामपंचायतीत मुरकुटे गटाची सत्ता तर तीन ग्रामपंचायतीत गडाख गटाला सत्ता मिळाली आहे.

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी काल तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणीला सुरवात झाली होती. मतमोजणीच्या ठिकाणी सकाळीच गर्दी झाली होती. सात ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी 21 उमेदवार रिंगणात होते तर सदस्य पदाच्या 75 जागांसाठी 376 उमेदवार रिंगणात होते. तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजनी पार पडली. तालुक्यातील करजगाव ग्रामपंचायतीत अपक्षांनी सत्ता मिळवली असली तरी भाजपने ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे.

यामध्ये पाचेगाव, करजगाव, फत्तेपुर, रस्तापुर या गावातील ग्रामपंचायतीत मुरकुटे गटाचे सरपंच निवडून आले. तर देडगाव, कौठा, पानेगाव या ग्रामपंचायतीत गडाख गटाचे सरपंच निवडून आले आहे. कौठ्यात गडाख गटातच लढत झाली आणि विजया डाके सरपंच झाल्या. एका गटाला नऊ पैकी आठ व दुसऱ्या गटाला एक जागा मिळाली. रस्तापुरमध्ये सत्तांतर झाले. तर फत्तेपुरमध्ये सत्तांतर होऊन मुरकुटे गटाकडे हि ग्रामपंचायत आली आहे.

जनतेचा पुन्हा एकदा विकासाला कौल
दुसऱ्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजपला म्हणजे विकासाला कौल दिला आहे.
व जनतेच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. जनता हि विकासाच्याच बाजूने आहे.
सर्व मतदारांचे आभार व नवनिर्वचित सरपंच ,सदस्य यांचे अभिनंदन – ज्ञानेश्वर पेचे, नेवासा तालुकाध्यक्ष भाजप