fbpx

जगात महान असलेली भारतीय संस्कृती व संत महंतांचे विचार वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न-भास्करगिरी महाराज

नेवासा/भागवत दाभाडे: जगात महान असलेली भारतीय संस्कृती व संत महंतांचे विचार वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आव्हान महंत भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्वर पर्वत येथील बालयोगी सदानंद महाराज आश्रम यांच्या वतीने नेवासा येथे आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून सांगता झाली.

याप्रसंगी सदानंद महाराज , सुनीलगिरी महाराज, पंढरपूर येथील हभप. आदिनाथ महाराज, शिवाजी महाराज देशमुख, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजी कर्डीले, माजी जि.प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, सुडके महाराज, गहिनीनाथ महाराज आढाव, नंदकिशोर महाराज खरात आदी उपस्थित होते. सोहळा समितीचे कार्याध्यक्ष शिवाजी महाराज यांनी सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार केला. व बालयोगी सदानंद महाराज यांचा नेवाकरांच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

भास्करगिरी महाराज म्हनाले कि, शांतिब्रम्ह सदानंद महाराज यांच्याकडे भक्तीचा ठेवा आहे. त्यांनी ज्ञानेशरी ग्रंथाची महती सर्वदूर जावी म्हणून देशातील अनेक ठिकाणी पारायणे केली. हिंदी व इंग्रजी मधील ज्ञानेश्वरी निर्माण करून तिची महती कळण्यासाठी विश्वात कवाडे खुली केली. नेवासा येथील सोहल्यामुळे आम्हाला पूर्वकाल निर्माण करून दिला. यावेळी सदानंद महाराज व भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी सुमारे पंचवीस हजार जनसमुदाय उपस्थित होता.महाप्रसादासाठी बालयोगी सदानंद महाराज भक्त परिवार व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या जय हरी परिवाराच्या वतीने स्वयंसेवक म्हणून योग्य नियोजन करण्यात आले होते.

सप्ताह मुळे नेवासा नगरी भक्तिमय झाली होती कार्यक्रमास नेवासा शहरासह तालुक्यातील लोकांनी लाभ घेतला