दुनिया हिला देंगे हम: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स…

Mumbai Indians

दिग्विजय दीक्षित, पुणे: २००८ साली जेव्हा सर्वप्रथम T-२० प्रकारातील या स्पर्धेची सुरवात झाली तेव्हापासून हा संघ २०१० चा अपवाद वगळता खूप जास्त प्रभाव दाखवू शकला नव्हता. २०१३ च्या मोसमात धडाकेबाज ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि कप्तान रिकी पॉंटिंगकडे संघाच्या कप्तानपदाची जबाबदारी आली, शृंखला मध्यावर असताना त्याने आणि संघ व्यवस्थापकांनी ही जबाबदारी रोहित शर्मा या तरुण-उमद्या आणि प्रचंड फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूवर टाकली.

त्यानेही आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीस साजेसे काम करून IPL च्या सहाव्या मोसमात मुंबईला पहिले विजेतेपद मिळवून दिले. यानंतर मात्र या संघाने मागे वळून पाहिले नाही. मुंबई इंडियन्स बद्दल अनेक नमूद करण्यासारख्या गोष्टी म्हणजे त्यांनी आपले महत्वाचे खेळाडू जसे की मलिंगा, पोलार्ड किंवा रोहित यांना दरवर्षी टिकवून ठेवले.

याचबरोबर नवीन आणि तरुण खेळाडूंवर व्यवस्थापनाने विश्वास टाकत फक्त मुंबईसाठीच नव्हे तर भारतीय संघासाठी सुद्धा बहुमूल्य खेळाडू घडवण्याचे काम केले, यात मुख्यत्वे जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांची नावे नमूद करता येतील. या संघाने घरच्या मैदानावर त्यांचे चांगले रेकॉर्डस् टिकवून ठेवले, तसेच रोहित शर्माच्या कप्तानपदामुळे आणि गोलंदाजांच्या अचूक कामगिरीमुळे खूप वेळा सामने रोमहर्षक बनवणे आणि शेवटी ते जिंकणे ही किमया त्यांनी घडवली.

२०१४ साली राजस्थान रॉयल्स या संघाला एक अभूतपूर्व असा पराभव दाखवल्यानंतर मुंबई कदाचित पुन्हा हा करंडक जिंकेल की काय असे वाटत असताना, हा संघ तेथून बाहेर पडला. मात्र २०१५ साली चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवून या संघाने रोहितच्याच नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा हा करंडक पडकवला.

२०१७ साली अंतिम सामन्यात फलंदाजांनी निराशा केल्यानंतर सामना जाणार असे वाटत असताना, पुन्हा एकदा गोलंदाजांची उत्तम कामगिरी आणि कर्णधाराच्या डावपेचांनी हा सामना निसटत्या अवस्थेत जिंकला आणि तिसऱ्यांदा हा करंडक पटकावला. मागील वर्षी अगदी शेवटच्या षटकापर्यंत लांबलेला सामना आणि मुंबईच्या गोलंदाजीतील हुकमी एक्क्याने अर्थात मलिंगाने शेवटच्या चेंडूवर मिळवून दिलेला चौथा करंडक समर्थकांच्या कायम लक्षात राहील.

यावर्षीच्या २०२० सालच्या दुबईमधील IPL मध्येही हा संघ सर्वोच्च नामंकितांपैकी एक आहेच. २०१४ साली दुबईमध्ये झालेल्या सुरवातीच्या सामन्यांमध्ये या संघाची कामगिरी तितकीशी समाधानकारक नाही परंतु यावर मात करून संघाने यावर्षीही आपल्या खेळाने क्रिकेट रसिकांची मने जिंकावीत ही अपेक्षा…!!

महत्वाच्या बातम्या:-

श्रीरामपुर शहरात आठ दिवस लॉकडाऊन!

‘घात झाला! उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण स्थगित करून दाखवलंच’

दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते- नुपूर मेहता