बटलरच्या जागी न्यूझीलंडच्या ‘या’ शिलेदराची राजस्थान संघात रॉयल एन्ट्री

बटलरच्या जागी न्यूझीलंडच्या ‘या’ शिलेदराची राजस्थान संघात रॉयल एन्ट्री

मुंबई: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांतच बीसीसीआयने उर्वरित स्पर्धेचे आयोजन युएई येथे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली.

स्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जोस बटलरने स्पर्धेतून माघार घेतली. बटलर ची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे त्यामुळे त्याने आयपीएल मधून माघार घेतली. त्याच्या जागी न्यूझीलंडचा यशिरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्स ची राजस्थान रॉयल्सच्या संघात एन्ट्री झाली आहे. ग्लेन सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग t-20स्पर्धेत बार्बाडोस रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. पुढील आठवड्यात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सिपीएल स्पर्धा संपल्यानंतर तो युएई त आयपीएल खेळण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघासोबत सहभागी होईल.

ग्लेनने न्युझीलंड कडून २५ आंतरराष्ट्रीय t-20सामने खेळले आहे. मागील वर्षी त्याने वेस्ट इंडिज विरूध्द 46चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले होते. न्यूझीलंड कडून हे सर्वात वेगवान शतक होते. या व्यतिरिक्त त्याने ऑकलंड कडून खेळताना दोन शतके झळकावली आहे. तर जमैका टलवाज कडून एक शतक झळकावले आहे. जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांच्या अनुपस्थित ग्लेन कडून राजस्थान संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या