… म्हणून पाकिस्तानविरोधात एकही सामना न खेळातच न्यूझीलंड तातडीनं मायदेशी परतणार

nz vs pak

कराची : पाकिस्तान-न्यूझीलंडल वनडे सीरिज रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रावळपिंडी वन डे सुरु होण्याआधीच मॅच रद्द करण्यात आली आहे. पहिल्या सामन्याचा टॉस होण्याच्या अर्धा तास आधीच मॅच रद्द करण्यात आली. 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी मॅचेसची सिरीज रद्द झाली आहे. न्यूझीलंड संघ आता परत मायदेशी जाणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेव्हीड व्हाईट यांनी सांगितले की, आम्हाला सिक्युरिटी अलर्ट देण्यात आला आणि त्यानंतर हा दौरा कायम राखणे आम्हाला शक्य नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा मोठा धक्का आहे, याची आम्हाला जाण आहे. पण, खेळाडूंची सुरक्षा ही आमचे प्राधान्यक्रम आहे आणि दौरा तुर्तास रद्द करणे हेच योग्य आहे.

दरम्यान, न्यूझीलंड सरकारनं सुरक्षिततेबाबत धोका असल्याचे कळवले आणि त्यामुळेच खेळाडू हॉटेलच्या बाहेर पडले नाही. आता त्यांना मायदेशात पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  PCBनं म्हटलं की,न्यूझीलंडच्या राष्ट्रध्यक्षांशी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः फोनवरून चर्चा केली. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम इंटेलिजन्स सिस्टम्स असल्याचे सांगून न्यूझीलंड संघाला कोणताच धोका नसल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या