आयसीसी क्रमवारीत न्युझीलंड संघाची पहिल्या स्थानी भरारी; भारतीय संघ तिसऱ्या स्थानी

मुंबई : आयसीसीने ३ मे रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. न्युंझीलडच्या संघाने या क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या स्थानी भारतीय संघ आहेत. तर यापुर्वी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला इंग्लंडचा संघ हा चौथ्या स्थानी पोहचला आहे.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्युझीलंडच्या संघाने बांग्लादेश विरुद्धची एकदिवसीय मालिका ही ३-० अशी जिंकली होती. त्या विजयामुळे न्युझीलंडचा संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचला आहे. पहिल्या स्थानी असलेल्या न्युझीलंडचे गुण हे १२१ आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाचे गुण ११५ आहेत. ही एकदिवसीय क्रमवारी १ मे २०१८ नंतर झालेल्या सामन्यांच्या निकालावरून जाहीर करण्यात आली आहे.

विश्वचषक २०१९ स्पर्धेचाही यामध्ये समावेश आहे. यापुर्वी यादीत सर्वोच्च स्थानी असलेला इंग्लंड संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेला न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी आला आहे. न्यूझीलंड संघाने श्रीलंका, भारत आणि बांगलादेश संघांना वनडे पराभूत केले होते. यासोबतच २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.

आयसीसीने जाहीर केलेली वनडे संघाची क्रमवारी

१) न्यूझीलंड : (१२१ )
२)ऑस्ट्रेलिया : (११८)
३) भारत : (११५)
४)इंग्लंड : (११५)
५)दक्षिण आफ्रिका : (१०७ )
६)पाकिस्तान : (९७)
७) बांगलादेश : (९०)
८) वेस्ट इंडिज : (८२)
९) श्रीलंका : (७९ )
१०) अफगाणिस्तान : (६२)

महत्वाच्या बातम्या