‘न्युझीलंड ६ गडी राखून विजय मिळवणार’, डब्ल्युटीसी फायनलवर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचा अंदाज

मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

या सामन्याच्या पार्श्वभूमिवर न्युझीलंड संघाचा माजी क्रिकेटपटु दिग्गज स्कॉट स्टायरीसने भविष्यवाणी केली आहे. एका चॅनेलमध्ये इरफान पठान सोबत चर्चासत्रात स्टॉयरीसने ही भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की,’ डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा विजय होईल. न्यूझीलंड संघ हा सामना ६ गडी राखून जिंकेल आणि सलामीवीर डेवोन कॉनवे या सामन्यात सर्वाधीक धावा करेल तर सर्वाधिक ट्रेन्ट बोल्ट हा सर्वाधीक गडी बाद करेल.’ अशी भविष्यवाणी स्टॉक स्टायरीसने केली आहे.

न्युझीलंडचा संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा आज दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ विलगीकरणातुन बाहेर आला असुन सराव करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP