ऑकलंडमध्ये रंगणार न्यूझीलंडमधील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

ऑकलंड : ऑकलंडच्या इडन पार्क मैदानावर न्यूझीलंडमधील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना रंगणार आहे. ऑकलंड काउन्सिलने या सामन्यच्या आयोजनास परवानगी दिली आहे. पुढील वर्षी इंग्लंडविरूद्ध २२ मार्चला हा सामना प्रस्तावित आहे.

या सामन्याच्या आयोजनास परवानगी दिल्याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी क्रमी यांनी ऑकलंड काऊन्सिलचे आभार मानले. या सामन्याच्या आयोजनामुळे जास्तीत जास्त क्रिकेट चाहत्यांना कसोटी सामन्याचा आनंद लुटता येर्इल, असेही क्रमी म्हणाले.