WTC स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड संघात मोठा बदल; टीम इंडियाची चिंता वाढली

टीम इंडिया

इंग्लंड : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

टीम इंडियाला लंडनमध्ये पोहचल्यानंतर ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागले. टीम इंडियाने मुख्य मैदानात आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली. कालपासून टीम इंडियाने पूर्ण संघासोबत प्रक्टिस सुरु केली आहे. जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया जय्यत तयारी करताना दिसत आहे.

दरम्यान, जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्याआधी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सीरिज सुरू आहे. र्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपआधी न्यूझीलंड संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. स्पिनर आणि केन विल्यमसन जखमी झाला आहे. दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध सीरिजमधून या दोघांनी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बदल केले आहेत. त्यांनी वेगळी रणनिती आखली आणि ती यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या न्यूझीलंडने टॉम ब्लंडेल, ट्रेंट बाउल्ट, विल यंग, डॅरेल मिशेल, मॅट हेन्री आणि अजाज पटेल यांचा संघात समावेश केला आहे. या खेळाडूंनी पहिला कसोटी सामना खेळला नव्हता. पाठदुखीने पीडित असलेल्या बीजे वॉटलिंगच्या जागी टॉम ब्लंडेलचा समावेश करण्यात आला आहे. जखमी केन विल्यमसनच्या जागी विल यंग खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP