न्यूझीलंडमध्ये भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रवेश बंदी !

न्यूझीलंड

नवी दिल्ली : गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून ते आजतागायत आपल्या आयुष्यावर असंख्य निर्बंध आले आहेत. आत्ताशा कुठे नवीन सुरुवात करणार तर पुन्हा एकदा कोरोनाने पूर्वरुप धारण केले. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अंधाराने आपले जीवन व्यापून टाकले आहे.

काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. यामध्ये भारत देखील आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडनं भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल.

त्यामुळे आता भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल. शुक्रवारपासून देशात IPL च्या चौदाव्या सीझनची सुरूवात होणार आहे. यामध्ये न्यूझीलंडचेही अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या