नववर्ष स्वागतावर आयसिसचे सावट; सुरक्षेसाठी ३० हजार पोलीस रस्त्यावर

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाईची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे आयसिसचा संभाव्य धोका पहाता मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास ३० हजार पोलीस तैनात रहाणार आहेत. यासाठी पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोणतीही क्लृप्ती वापरून आयसिसकडून दहशतवादी कारवाया केल्या जाण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून मरिन ड्राईव्ह, वरळी सी-फेस यांसारख्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या भागांत नो पार्किंगही जाहीर करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर व संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाकडून या भागांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत पोलिसांनी काही विशेष रस्ते व पदपथ यांची यादी केली आहे. या संदर्भातील विस्तृत अहवाल सरकारला सादर केल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

You might also like
Comments
Loading...