विराट कोहलीचा विक्रम; गांगुली, धोनीला टाकले मागे

blank

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाने विंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २५७ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. टीम इंडियाने सांखिक खेळाच्या जोरावर हा विजय मिळवला आहे. भारतानं दिलेल्या ४६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे २१० धावांपर्यंत मजल मारू शकला.

या विजयासह विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. त्याने माजी कर्णधार सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. आतापर्यंत विराट कोहलीने कर्णधार म्हणून ४८ सामन्यांत २८ विजय मिळवले असून महेंद्रसिंग धोनीने ६० सामन्यांत २७ विजय मिळवले आहेत. धोनीचा हा विक्रम मोडत त्याने सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये अग्रस्थान गाठले आहे.

तसेच विराट कोहलीने परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. परदेशात विराट कोहलीने २६ सामन्यात १२ कसोटी विजय मिळवले आहेत.तर सौरव गांगुलीने २८ सामन्यांत ११ कसोटी विजय मिळवले होता. त्यामुळे हाही विक्रम कोहलीने आपल्या नावे केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत सर्वाधिक ५३ कसोटी विजय दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगच्या नावावर ४८ विजय आहेत. तर भारतातर्फे कोहलीच्या नावावर २८ तर धोनीच्या नावावर २७ विजय आहेत. गांगुलीच्या नावावर २१ विजय आहेत.