एल्गार परिषदेवरून थोरात विखेपाटलांमध्ये जुंपली

अहमदनगर : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला सरकारमधील घटक पक्षच विरोध करत आहे. यावरून महाविकास आघाडीतील विसंवादी सूर समोर येऊ लागला आहे. एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय?’ असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबत भाष्य केलं होतं. एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. असा आरोप थोरात यांनी केला होता. यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Loading...

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते असताना हीच भूमिका आपण सभागृहात मांडली होती. या विषयाबाबत हीच मंडळी गप्प होती. आता त्यांनीच माध्यमांचे लक्ष वेधले असल्याचा टोला विखेंनी लगवाला. तर कोणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे दुसऱ्याच्या हातातील बाहुले बनून भूमिका मांडण्याचा प्रयल आहे.  मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही, अशीही टीकाही विखेंनी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे