विधानपरिषद निवडणूक; शिवसेनेचं संख्याबळ वाढणार

shivsena

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये निकालानंतर शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र समोर आले आहे. कारण कार्यकाळ संपलेल्या या ६ जागांमध्ये काँग्रेसची १, भाजपाच्या २, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ या विविध पक्षांच्या जागांचा समावेश होता. परंतु एकही जागेवर याआधी शिवसेना आमदार नसताना २ जागा निवडून आणत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भाजपाला पण धोबीपछाड दिला आहे. दोन्ही ठिकाणी नाराज सर्वपक्षीय मतदार यामध्ये महत्वाचे ठरले आहेत, तरीही कोकणात शिवसेनेला पालघर लोकसभा निवडणुकीवरून कोंडीत पकडत भाजपाने दगाफटका केला, नाहीतर आणखीन एक जागा शिवसेनेला मिळाली असती.

शिवसेना उमेदवार निवडून आलेल्या परभणी-हिंगोलीत गेल्या वेळी राष्ट्रवादी आमदार बाबा दुराणी यांनी सहज विजय मिळविला होता. परंतु यावेळी ही जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसेनेचे काम सहज सोपे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज मतदारांनी शिवसेनेला मतदान केले व शिवसेनेचे विप्लव बाजोरिया निवडून आले. शिवसेनेला इथे २५६ मते मिळाली तर काँग्रेस उमेदवार सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली. यामध्ये भाजपा मतदारांनी निर्णायक मतदान केले. जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असती तर कदाचित इथे निकाल वेगळा लागला असता अशी चर्चा आहे.

Loading...

तसेच नाशिक स्वराज संस्था मतदार संघात शिवसेना व मित्रपक्षांचे मतदान हे फक्त २२१ असतानाही शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ६४४ पैकी तब्बल ३९९ मते मिळाली आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजी सहाणे यांचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण यावेळेस राष्ट्रवादी नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेला साथ दिल्याचे दिसत असून, भाजपा नाराज मतदार सुद्धा शिवसेनेला येऊन मिळाले असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेस व भाजपानेही पाठिंबा दिला असल्याने राष्ट्रवादीचे सहाणे सहज विजयी होतील असे वाटत असताना सेनेच्या दराडे यांनी बाजी मारली. स्थानिक शिवसेना नेत्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची जुळवाजुळव करून राष्ट्रवादीसह काँग्रेस व भाजपाला मात दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील