Bajaj Dominar- बजाज डॉमिनर ४००ची नवीन आवृत्ती

बजाज कंपनीने आपल्या डॉमिनर ४०० या दुचाकीची मॅट ब्लॅक या रंगातली नवीन आवृत्ती लाँच केली असून देशभरातील शो-रूम्समधून याची नोंदणी सुरू झाली आहे.

बजाजने गेल्या वर्षाच्या शेवटी डॉमिनर ४०० हे मॉडेल एबीएस आणि नॉन-एबीएस या दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे १.३६ आणि १.५० लाख रूपयांत बाजारपेठेत उपलब्ध केले होते. यात आता मॅट ब्लॅक रंगाच्या आवृत्तीची भर पडणार आहे. पल्सर सीएस ४०० या मॉडेलच्या डिझाईनप्रमाणे या मॉडेलची संरचना आहे. यात अ‍ॅटोमॅटीक हेडलाईट ऑन (एएचओ) या फिचरसह फुल एलईडी हेडलाईट सिस्टीम असेल. यात उत्तम दर्जाचा एलईडी डिस्प्लेदेखील प्रदान करण्यात आला आहे. तर याच्या इंधनाच्या टाकीवर दुसरा डिस्प्ले असून यावर इंधनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल स्प्रींग मोनो शॉक-अप असतील. तसेच यात १७ इंची डायमंड कट अलॉय व्हिल्स आहेत.

बजाज डॉमिनर ४००च्या या आवृत्तीत ३७३.३ सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर लिक्विड कुल्ड इंजिन असून याला सिक्स स्पीड गिअर्सला संलग्न करण्यात आले आहे. तर याच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक प्रदान करण्यात आले आहेत. हे मॉडेल रॉयल एनफिल्डची क्लासीक ३५० आणि महेंद्राची मोजो या बाईक्सला तगडे आव्हान देऊ शकते.

Comments
Loading...