नोटांवर लिहिलं अथवा रंग गेल्यास आता चिंता नाही

दहा रुपयांचे नाणे वैध असल्याच स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे

टीम महाराष्ट्र देशा: ५०० व २००० रुपयांच्या नोटांवर लिहिलं किंवा रंग गेला तर बँका स्वीकारणार नाहीत अश्या आशयाचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. ५०० व २००० च्या नोटांवर काही मजकूर असेल किंवा त्या नोटांचा रंग गेला असेल तरीपण त्या सर्व नोटा बँकांमध्ये स्वीकारल्या जातील अश्या नोटा बँका नाकारू शकत नसल्याचे स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे. मात्र त्या नोटा बदलून मिळणार नाहीत त्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. नव्या नोटा बदलून देण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार नाही. दहा रुपयांच्या नाण्यासंदर्भात देखील तक्रारी आरबीआय कडे आल्या आहेत पण दहा रुपयाचे नाणे वैध असल्याचे देखील आरबीआयने नमूद केले आहे.

You might also like
Comments
Loading...