fbpx

जाणून घ्या बजरंग सोनावणेंना मेटेंनी का दिला पाठींबा?

Vinayak Mete

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सेना-भाजप युतीसोबत राहू, असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मांडले होते. मात्र, बीडमध्ये भाजपविरोधी उघड भूमिका घेतल्यानंतर आता पाठिंबा कुणाला द्यायचा हे गुरुवारी शिवसंग्रामतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे.

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे.काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसंग्रामचे जिल्हा परिषद सदस्य फोडत मेटेंना पंकजा मुंडेनी चांगलाच धक्का दिला. दरम्यान, याआधी देखील शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विनायक मेटे यांची साथ सोडून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मेटेंच्या पक्षातील मातब्बर नेते भाजपच्या गळाला लागल्याने विनायक मेटे पक्षातच एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.

यासर्व घडामोडींमुळे लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली होती. राज्यात भारतीय जनता पक्षाची शिवसंग्राम पक्षाशी युती आहे, बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात असा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. यामुळे यापुढे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही परंतु राज्यात भाजपसोबत काम करणार असल्याचा निर्णय विनायक मेटेंनी घेतला आहे.

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना जवळ केल्याने विनायक मेटे नाराज झाले होते. शिवसंग्रामचे प्रदेशाध्क्ष राजेंद्र म्हस्के यांनाही पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांच्यापासून दूर केलं होते. त्यामुळेही विनायक मेटे यांनी हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. मेटेंच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना किती फटका बसतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.