निवडणुका आल्या की, सर्जिकल स्ट्राइक करायचे हा मोदी सरकारचा पॅटर्नच – अखिलेश सिंह

टीम महाराष्ट्र देशा : ”कुठल्याही मोठ्या राज्यात निवडणूक असली की सर्जिकल स्ट्राइक करायचे , हा मोदी सरकारने पॅटर्नच बनवला आहे. आता खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकवर राजकारण केले जाईल,” असा टोला काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांनी लगावला आहे. आज (ता. २०) आज सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्ताननी लष्कराने चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार केला.

पाकिस्तानाने केलेल्या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यावर प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तोफांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत २२ दहशतवाद्यांसह ११ पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. दरम्यान, लष्कराच्या या कारवाईनंतर आता राजकारणासही सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपाने या कारवाईचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी या कारवाईवर उपहासात्मक टीका केली आहे.

यावेळी भारतीय जवानांनी उखळी तोफांचा मारा करत दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे. या कारवाईत कारवाईत ११ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर २२ हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :