fbpx

पश्चिम बंगाल : राज्यपालांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे सावट

amit shah and pm narendra modi

टीम महाराष्ट्र देशा- पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार आणि निवडणुकीनंतरही तिथे सुरू राहिलेले हिंसाचाराचे लोण या पार्श्वभूमीवर आता प. बंगालमध्ये राज्य सरकार बरखास्त करून, तिथे राष्ट्रपती राजवट आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याचसाठी सोमवारी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली. या भेटीत आपण राज्यातील स्थितीची माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली. मात्र भेटीचा सविस्तर तपशील आपण सांगू शकत नाही, असं त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसनंही पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून ममता बॅनर्जी आणि भाजपला लक्ष्य केलं. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याशिवाय निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असं विधान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं आहे.